पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिवाळी

दिवाळी दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास.. दिवाळी म्हणजे झगमगत्या कंदिलाचा प्रकाश.. दिवाळी म्हणजे श्री रामांचे आगमन, दिवाळी म्हणजे श्रीकृष्णाचा नरकासुरवर विजय.. दिवाळी म्हणजे नरकसुराच्या तुरंगातून स्त्रियांची मुक्तता.. दिवाळी म्हणजे तो छत्रपतींचा किल्ला.. दिवाळी म्हणजे लाडवाचा गोडवा, दिवाळी म्हणजे चकली चा खुशकुशीत पणा.. दिवाळी म्हणजे नयनरम्य आतिषबाजी.. दिवाळी म्हणजे अंगणातील मोहक रांगोळी... दिवाळी म्हणजे भगवान महावीर यांची मोक्षप्राप्ती.. दिवाळी म्हणजे शीख गुरू हरगोबिन्द सिंह यांची सुटका.. दिवाळी म्हणजे मामाच्या गावी जाण्याची घाई... दिवाळी म्हणजे मन प्रसन्न करणाऱ्या संगीताची पहाट.. दिवाळी म्हणजे तो उटण्याचा सुगंध.. दिवाळी म्हणजे कुटुंबाचा एकोपा.. दिवाळी म्हणजे आई महालक्ष्मी चे दर्शन.. दिवाळी म्हणजे आनंद, सुख, समृद्धी,सत्याचा विजय.. - सौरभ कासोटे तुम्हा सर्वांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा..🙂

वचन

वचन अष्टमीचा अर्धकोर चंद्र तसा अगदी दिमाखात "रजनीकांत" या नावाला शोभेल असा निरभ्र आकाशात स्थानापन्न होता.. रात्रीचे ८:३०-९ वाजायला आले होते.. देवघरातील दिवा लावून तास-दीड तास झाला होता.. त्याचा कॉल आलेलाच की वेळ होईल म्हणून पण इतका वेळ यामुळे ती काळजीने थोडी अस्वस्थ झाली होती.. गळ्यातील ते अगदी दुरुनही उठून दिसेल असे सोन्याच्या मंगळसूत्राबरोबर ची तिच्या हातांची झटपट सांगत होती की ती आता खूपच अस्वस्थ झालीये...!! सारखे ते तिचे सुबकरदार पण थोडे पाणावलेले डोळे दाराकडे पाहत होते.. कानामध्ये जरी वजनदार अश्या design चे दागिने असले तरी कानांचे लक्ष बाहेर त्याची गाडी येते की नाही याकडेच होते.. स्वयंपाक करण्यासाठी ही मन होत नव्हते.. चपाती करण्यासाठी कणिक मळली होती पण तिला अजून चांगला आकार घेऊन तव्यावर अंग शेकण्याचा योग येत नव्हता.. कूकर च्या ३-४ शिट्या झाल्या असतील पण आज त्याला नजर चूकीमुळे जास्त काम लागणार याची शक्यता दिसत होती..!!! नेमका फोन करावा तर तो गाडीवर असेल आणि रोडवरून येताना ट्रॅफिक खूप असते त्यामुळे तो नाही उचलणार याची खात्री तिला होती..त्यामुळे तिने तो विचार सोडून दिला.. थ

प्रेम

यांसी प्रेम ऐसें नाव..!! १६-१७ वय अन नवीन कॉलेज, नवीन मित्र, मोबाईल वैगेरे.. अन तोवर हळूच पाय न कळत घसरतो.. अगदी चित्रपटातील हिरो हिरोईन सारखा वाटू लागतं.. सतत कोणतातरी गाणं गुणगुणाव अस वाटतं.. अस वाटतं ही तर माझ्या साठी बनलेली आहे.. मग नशिबावर विश्वास बसायला लागतो, अस वाटतं देवानेच आमची गाठ भेट लिहून ठेवली आहे..!! काही दिवस बोलणं, मग ते रात्री ३-४ पर्यंत जागनं.. तिच्या/त्याचा आवाजाने दिवसाची सुरुवात.. दिवस पुढे पुढे सरतात.. नव्याचे नऊ दिवसा प्रमाणे सुरुवातीला "तुमच्यासाठी कायपण" असतं, पण नंतर थोडी भांडणं थोडा अबोला आणि जास्तच झाले तर ब्रेकअप..!! विषय संपला.. मग काही दिवसांनी लैला ला दुसरा मजनू आणि मजनू ला दुसरी लैला भेटते..!! ब्रेकअप झाला की यांचं "प्रेम" ही संपत..!! म्हणूनच मी ३ ऱ्या ओळीत म्हणालो ,"पाय घसरतो" कारण ते फक्त आकर्षण असतं, आभासी जग असतं..!! काही नाती टिकतात, अगदी लग्न करून शेवटपर्यंत.. त्याचं "प्रेम" असतं, आकर्षण नाही.. पण काही नाती "प्रेमाच्या" नावाखाली फक्त आकर्षण असतात.. प्रेम ही खूप वेगळी गोष्ट आहे.. खूप वेगळी..

Steve Jobs Speech marathi

इमेज
स्टिव्ह जॉब्स यांचे स्टॅनफोर्ड मधील भाषण  भाषण  "जगातल्या सर्वोत्तम, म्हणून गणल्या जाणाऱ्या महाविद्यालयांपैकी एक अशा महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात तुमच्यासोबत बोलण्याचा  मान मला मिळत आहे. आता सत्य सांगायला हरकत नाही, पण मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण करू शकलो नाही. महाविद्यालयीन दीक्षांत समारंभ इतक्या जवळून मी पहिल्यांदा पाहतो आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगू इच्छितो . बस्स... काही मोठा करार  नाही. फक्त तीन छोट्या गोष्टी.....! Steve Jobs: The Exclusive Biography (Online on Amazon)        पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याच्या संदर्भातली...  मी रीड कॉलेजमधून पहिल्या सहा महिन्यांतच बाहेर पडलो होतो, पण खरोखर बाहेर पडण्याआधी मी जवळपास १८ महिने कॉलेजमध्येच ड्रॉपइन म्हणून घुटमळत हो तो.... मग मी बाहेर का पडलो ?याची सुरुवात खरं तर माझ्या जन्माच्या आधीपासूनची आहे. माझी जन्मदाती  आई ही एक तरुण, अविवाहित महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती आणि तिने मला दत्तक द्यायचं ठरवलं. तिची फार इच्छा होती की, मी एका पदवीधर पालकांकडे दत्तक म्हणून जावं, त्यामुळे अखेर एका वकील दाम

Achyut godbole books

अच्युत गोडबोले यांच्या बद्दल थोडं  १. शालान्त परीक्षेत राज्यात १६वा, तर विद्यापीठात पहिला क्रमांक  २. पहिली ते आय.आय.टी. पर्यंत गणितात जवळपास सर्व परीक्षांत सर्वोच्च गुण आणि पारितोषिकं  ३. आयआयटी मुंबईचे केमिकल इंजिनियर, १९७२ ४. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात ३२ वर्षाचा अनुभव, यामध्ये भारत, इंग्लंड आणि अमेरिकेतील अनेक जगन्मान्य, आंतरराष्ट्रीय कंपन्यांत काम ५. सॉफ्टवेअरच्या कामानिमित्त १५०हून अधिक वेळा जगप्रवास    ६. पटणी, सिंटेल, एल अँड टी इन्फोटेक, अपार, दिशा वगैरे अनेक मोठ्या कंपन्यांच्या सर्वोच्चपदी असताना त्यांची जगभरात अनेकपटीने वाढ करण्यामध्ये हातभार  ७. टाटा मॅकग्रॉ-हिलतर्फे जगभर वापरली जाणारी कम्प्युटरवरची 'ऑपरेटिंग सिस्टिम्स', 'डेटा कम्युनिकेशन्स अँड नेटवर्क्स', 'वेब टेक्रॉलॉजीज' आणि 'डीमिस्टिफाईंग कम्प्युटर्स' ही चार प्रत्येकी ६००-८०० पानी पाठ्यपुस्तकाचं लेखन. चिनीसकट अनेक भाषांत ही पुस्तकं अनुवादित  ८. मराठीतून 'संगणकयुग' (कम्प्युटर), 'बोर्डरूम' (व्यवस्थापन), नादवेध' (संगीत), 'किमयागार' (विज्ञान), 'अर्थात&#

पुरेपूर कोल्हापूर

फुटबॉलचे माहेरघर आणि चित्रपट सृष्टीचे माहेर, असं आमचं कोल्हापूर..!! घडते अनेक कलाकार आमच्या कोल्हापुरात त्यांचा नावलौकिक अख्या जगात; घडती अनेक मल्ल आमच्या कोल्हापूरच्या मातीत, मिळवती विजय कुस्ती या खेळात..!! दागिन्यांचा प्रकार एक "कोल्हापुरी साज"  जगात प्रसिद्ध आहे तो आज जगात प्रसिद्ध आहे तो आज.. पोषाख असा आमच्या कोल्हापूरचा  पायात कोल्हापुरी चपला, डोक्यावरती मानाचा कोल्हापुरी फेेटा..!! कोल्हापुरी गूळ आणि कोल्हापुरी मिसळ  जगात लय भारी  कोल्हापुरी कोल्हापुरी मिसळ  जगात लय भारी.. तांबडा पांढरा रस्सा येऊन घ्या आमच्या कोल्हापुरी  तांबडा पांढरा रस्सा येऊन घ्या आमच्या कोल्हापुरी..!! सौरभ भगवंत कासोटे, कोल्हापूर माझे इतर लेख :  सौरभ (कोल्हापूर बद्दल दुसरी कविता : कोल्हापूर   )

कोल्हापूर

ताराराणी यांनी स्थापिले एक राज्य , तेच आमुचं कोल्हापूर  कलेचं आणि कलाकारांचं माहेरघर.. महालक्ष्मीच्या पदस्पर्शाने झाले हे पवित्र  शाहूमहाराजांच्या कार्याने झाले हे पावन.. पंचगंगेच्या काठी वसलेले हे गाव  कलापूर हे त्याचे एक नाव..!! अनेक कलांचा उगम झाला कोल्हापुरात  म्हणून नाव आहे कलापुर सर्वांच्या मुखात.. रंकाळ्याच्या काठावर बसला आहे एक पॅलेस..  प्रेक्षकांच्या भावतो तो मनास.. भवानी मंडप हा कोल्हापूरकरांचा मान  अन कोल्हापूर हीच आमची शान  कोल्हापूर हीच आमची शान..!! - सौरभ भगवंत कासोटे, कोल्हापूर (कोल्हापूर विषयी दुसरी कविता :  पुरेपूर कोल्हापूर ) माझे इतर लेख :  सौरभ

Self help books

  1. The monk who sold his Ferrari : https://amzn.to/3fVRCNM 2. Ikigai: The Japanese secret to a long and happy life : https://amzn.to/2DaL9jm 3. The Alchemist : https://amzn.to/30JpvLy   4. Attitude Is Everything: Change Your Attitude ... Change Your Life! : https://amzn.to/2ZZvpc8 5. Rich Dad Poor Dad : What The Rich Teach Their Kids About Money That the Poor and Middle Class Do Not! : https://amzn.to/3eXdIOB 6. Think and grow rich : https://amzn.to/332hXX0   7. The 7 Habits of Highly Effective People https://amzn.to/30UeBCI 8. Good Vibes, Good Life: How Self-love Is the Key to Unlocking Your Greatness https://amzn.to/2X1MAIg 9. The Power of Your Subconscious Mind https://amzn.to/332cQpt 10. The Secret https://amzn.to/2X03tTq   11. Deep Work: Rules for Focused Success in a Distracted World https://amzn.to/332EPWe 12. Eat That Frog!: 21 Great Ways to Stop Procrastinating and Get More Done in Less Time https://amzn.to/3f7zDmq 13.

घटस्फोट

खिडकी तशी पूर्णपणे खुलीच होती.. त्यामुळे खिडकीतून वारा मनसोक्तपणे आत बाहेर करत होता.. दरवेळी खिडकी बंद असल्यामुळे आवाज करत, गोंगाट करत , मला आत यायचं आहे अस म्हणणारा वारा आज आनंदाने वाहत होता.. त्या वाऱ्याच्या इकडून तिकडून येरझाऱ्या मुळे की काय देवघरातील सदैव डोळ्यात तेल घालून जागी असणारी समईची वात ही कावरी बावरी झाली होती.. तो त्या दिव्याचा प्रकाश देवांच्या त्या लहान आकृत्यांना किती तेज देत होता..!! अगदी ते सोन्याचे देव उठून दिसत होते.. पण अचानक वाऱ्याची शांतपणे झुळूक आली अन दिवा विझवून गेली...!! स्वयंपाक घर ही तस अस्ताव्यस्त च होतं.. कट्यावर भांडी तशीच पडून होती, झुरळांची मस्त पार्टी सुरू होती.. पाण्याचा नळ तर तसा प्रत्येक आपला आसृला आवाज देत मोकळे करीत होता.. खूप दिवस झाले तो नळ बिघडला होता पण रोजच्या धावपळीच्या जीवनात कोणाला वेळ आहे दुसऱ्याच रडणं ऐकण्यासाठी..!! त्यामुळे तो बिचारा नळ एकटाच आसृ गाळत होता... बेडरूम ही तशी शांतच होती.. कपटाचे दार ही खुलेच होते,  कपटामधील नेहमीच्या त्या साड्या अन पंजाबी ड्रेस आज कोठे दिसतच नव्हता.. दरवेळी आज मी बाहेर जाणार या शर्यती मध्ये एकमेकांशी भांड

ती आता नाही येणार परत

  "ती आता नाही येणार परत, मान्य कर आणि शोध दुसरी" अरे, नाही येणार म्हणजे? खूप वेळा भांडणे झाली आहेत, पण ते चिमणीच पिल्लू जस उंच आकाशात झेप घेऊन पुन्हा घरट्यात येत तस तीही येतच होती..!! अरे, तो दिवाळीचा दिवस होता, दरवेळी मित्रांबरोबर फटाके उडवणारा मी त्यादिवशी तिला घेऊन महालक्ष्मी ला गेलो होतो.. थंडी होतीच पण तिच्या अंगाचा उटण्याचा सुवास दरवळत होता जस अगदी त्या रातराणी सारखा..!! दरवेळी ते वेगवेगळ्या style चे कपडे घालणारी ती पंजाबी ड्रेस मध्ये अगदी निरभ्र आकाशमध्ये चांदण पडत तशी सुंदर दिसत होती.. चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो मान्य आहे पण हीच रूप म्हणजे अगदी चंद्राचं मंद आणि हवंहवंसं वाटणार होतं... आई महालक्ष्मी तर अगदी दिवाळी मुले खूपच सजली होती, सगळी कडे फुलांची आरास होती, दिवे लागले होते, आई महालक्ष्मी ने तर मी अन ती येणार आहेत म्हणुन सगळीकडे प्रसन्नता पसरवली होती असच वाटत होते..!! आम्ही जेव्हा गेलो दर्शनाला तर आई महालक्ष्मी चे हास्य अन ते डोळे अस सांगत होते की तिला ही खूपच आनंद झाला आहे आम्ही आल्याचा..!! अन तेव्हा हिने आई कडे आमच्या प्रेमासाठी मागणे ही मागितले.. अरे लहान मुल

17 March 2018

 दोन वर्षापूर्वी.. हा दिवस.. नेमकं याला the best day म्हणावं की the worst day हेच नाही कळत.. तू घरी आली होतीस आणि आपण इतक्या जवळ आलो होतो की ते क्षण अजूनही असे डोळ्यासमोर आहेत अन त्याच दिवशी रात्री तू सोडून गेलीस मला कायमच.. बहुतेक तुला माहिती नसावं, नवीन माणसांमुळे विसरली असणार तु... आज २ वर्षे झालीत तरीही मी move on च होऊ शकलो नाहीये ग.. असा दिवसच आला नाही की त्या दिवशी तुझी आठवण आली नाही की अशी रात्र आली नाही की त्या रात्रीच्या स्वप्नांमध्ये तू आली नाहीस.. प्रत्येकजण म्हणतो,"सौऱ्या काय असतंय, ती तिकडं एन्जॉय करत्या अन तू अस देवदास होतंयस" पण प्रत्येकाला कस सांगू की किती स्वप्न पहिली होती, किती त्या एखाद्या शुभ्र पांढऱ्या कागदावर कुंचल्याचा एक हात फिरवावा तशी स्वप्नं रंगवली होती.. २ वर्षे मी माझा B'day काय दिवाळी पन साजरी नाही केली.. तुझा कळत खूप काय काय.. तुझा गोव्यातील bday,pub च्या पार्ट्या, ड्रिंक वैगेरे आणि बरच काही.. फक्त त्यांना ok एवढचं बोलतो अन त्या स्मशानातल्या शांततेत हरवून गेलेलो असतो तोवर तो हळूच हुंदक्याचा आवाज वर्तमानात आणतो.. अजूनही होते असं.. खूप जण म्ह

Past

 आज सकाळ पासूनच लक्ष कोठेही लागत नाहीये.. पाऊस तर बाहेर सुरूच आहे.. थोडी थंडीही आहे..  हातावरचे लव असे एकमेकांना आधार न देता उभे राहिलेत..  हळूच थंड हवेची झुळूक येते अन एक वेगळाच अनुभव देऊन जाते.. समोर खिडकीतून प्रकाश येतोय पण डोळ्यांसमोर तर भूतकाळाच्या आठवणी नाचतायेत.. मागे बाबांच्या कॉम्पुटर चा तो आवाज तर मोबाइल मधील gaana मधील त्या "प्रेमम"चं "मलारे" गाणं वाजत आहेच..  अर्थ वैगरे काहीच कळत नाहीये पण ते भूतकाळाच्या सुखद आठवणींचा अनुभव होतोय.. असं वाटतंय ती हसतीये.. अस वाटतंय ती अजूनही सभोवताली आहे.. हा ती वाऱ्याची झुळूक येते तेव्हा अगदी ते शरीराला जसा वाटतं ना ते तिच्या त्या मिठीत असताना वाटत होत.. हो अगदी तसच.. तो दीर्घ श्वास घेण्यासाठी हुंदका हळूच बाहेर येत आहे.. अजूनही तो आसू बाहेर येत नाहीये.. फक्त दीर्घ श्वास आणि त्या आठवणी इतकंच.. आणि इतक्यात डोक्यामधल्या त्या मेंदू मध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू झाली आहे मला पुन्हा वर्तमानात आणण्याची.. जागा हो सौर्या जागा हो..!!! - सौरभ कासोटे Online education :  https://saurabhkasote.blogspot.com/2020/08/Onlineeducation.html

online शिक्षण

 online शिक्षण या covid-19 मुळे "onlineशिक्षण" हा ट्रेंड आणि त्या नावाखाली "मोबाईल, टॅब इत्यादी" उपकरणे वापरणे हे आता जणू गरज आहे असं वाटत आहे. एक वेळ अन्न, वस्त्र,निवारा नसेल तरी it's ok पण.. असाच एक किस्सा.. माझी एकदम जवळची नातेवाईक.. इयत्ता १२ वी, कॉमर्स..!! तर ते व्हाट्सअप्प ला वैगेरे व्हिडिओ येतात मग असलेल्या मोबाइल ची मेमरी कमी पडू लागली म्हणून मला फोन आला,"कोणता मोबाईल घेऊ?" मी म्हणालो मेमरी कमी पडतीये तर मेमरी कार्ड घे , ७००-८०० रुपये पर्यंत पडेल, स्वस्त मस्त.. पण तिचा सूर मोबाइल घेण्याचा होता.. मोबाइल पाहू लागलो तर किंमती १० हजार पासून पुढे.. असुदे, कोणता तरी सुचवला.. आणि एक आठवड्याने कॉल आला,"मोबाईल घेतला", १०६०० कायतरी, रिअल मी असं कायतरी, एकदम आठवलं अरे हा तर ब्रँड फोटो साठी वैगरे घेतात,जर शिक्षणासाठीच हवा होता तर ९००० पर्यंत आहे की ४ gb रॅम वगैरे असणारे.. असो मग मी तिला एक प्रश्न विचारला,"गणिताच्या पहिल्या प्रकरणाचे नाव काय ग, दुसऱ्या प्रकरणाचे नाव?" "अरे गणित नसतं आम्हाला, म्हणजे ते अकाउंट मध्ये असतं&

BOIS Locker Room

इमेज
BOIS Locker Room दोन दिवस झाले प्रकरण खूपच गाजत आहे..!!! खरंच चूक कोणाची नेमकं हा प्रश्न येतोय..!!! Social मीडिया ची का? त्या १५-१७ वयातल्या मुलांची? मुलांच्या पालकांची? की वयाची (teenage)? आज काल पाहतोय, मुलं रडायला लागली की हा घे मोबाईल..!!! मग ते लाडकं बाळ शांत होत.. आमच्या वेळी मोबाइल वैगेरे नव्हताच.. तेव्हा ते संध्याकाळी pubg खेळण्याऐवजी आम्ही मैदानात क्रिकेट खेळायचो.. रामरक्षा,शुभंकरोती,हनुमान चालीसा रोज असायचं.. पण आता त्या tiktok वरील आवाज ऐकू येतायेत... सगळी कडे म्हणले जाते sexual education दिले पाहिजे.. अहो नेमकं ते आहे तरी काय हे सांगा ना मग पालक देतील ते... म्हणून १० वीला धडा पण केला.. पण मार्क पडण्याच्या शर्यतीत नेमकं sexual education च नाही मिळालं.. आजकाल हे social media च इतकं प्रमाण वाढलंय.. अरे ते ७-८ वर्षाचं पोरगं इंस्टा ला असतंय.. त्याला ५ चा पाढा येत नाही आणि इंस्टाला मात्र ५०-७० follow वैगरे असतात.. मी इंस्टा, फेसबुक वापरत नव्हतो आता ते ही engineering world साठी fb ला आलोय.. पण ७-८ वी ची मुले हसतात, दादा, तू इंस्टाला नाहीस 😂 हा त्यांचा दोष अजिबात नाहीये,खरंच नाहीय

लॉकडाउन चा पहिला दिवस

लॉकडाऊन चा पहिला दिवस तशी नेहमी प्रमाणे चौकात ४-५ पोर थांबली होती.. पण पानपट्टी बंद असल्याने रस्ता रंगवायचे काम तस बंदच होते.. शाहू बँकेजवळ ५-६ जेष्ठ नागरिक बसले होते, इस्लामपुरात ४ घावलीत बघा, सातरयात एक.. तोवर एक पोलिसांची गाडी आली आणि एक साहेब उतरून त्यांनी त्या जेष्ठ नागरिकांना नमस्कार च केला, वरती मान करेपर्यंत सगळे आपआपल्या घरी.. मी मात्र अत्यावश्यक (माझ्यासाठी) वस्तू साठी फिरत होतो, संदीप बेकरी बंद.. शेवटी तिच्या अपार्टमेंट मध्ये एक दुकान सुरू होते तिथे मिळाले.. शाहू बँकेजवळ गेलो आणि पाहिले, तिची खिडकी ही open होती, light ही होती, बहुतेक वर्क फ्रॉम होम करत असावी..काळजी मिटली..😅 तसं उमेश काकांच्या दुकानात नेहमी पेक्षा जास्तच गर्दी होती.. नंगीवली चौकातील मटणाची दुकाने मात्र बंद होती नाहीतर ते जाता येता बाहेर लोंबकळत असलेले मटण पाहून तेवढंच बरं वाटतं.. पन आज काय तसं सकाळी वाचलेल्या राशी भविष्याप्रमाणे "मनाला समाधान" मिळणार नाही हेच खरं वाटलं..

लॉकडाऊन

लॉकडाऊन २०२० घामाच्या कश्या धारा येतायेत.. जसा ते लहानपणी क्रिकेट खेळताना,ते कॉलेजला गेल्यावर फुटबॉल खेळताना होत होतं अगदी तसं.. त्या मुंबईला लोकल मध्ये पाहिलेलं एखादं जोडपं कसं एकमेकाला चिटकून उभा राहत तसा शर्ट ही घामामुळे अगदी अंगाला चिटकून थांबलाय.. बाहेर फक्त फक्त शांतता पसरलीये, हा ती शांतता, कराड मध्ये शेवटच्या दिवशी रात्री १-२ ला नदीच्या पुलावर गेलो होतो अगदी तशीच... तो वाहणारा वारा कोठेतरी या काँक्रेट च्या जंगलात वाट चुकवून कोठे गेलाय काय माहिती की त्याने पण ठरवलंय जास्त बाहेर फिरायचं नाही..?? ती खाली लहान मुलेही खेळत नाहीयेत असं वाटतय मुलांच्या परीक्षेचा काळ सुरू आहे..!! हा पण ते कोकिळेचं कुहू-कुहू अगदी स्पष्ट ऐकू येतंय मग तिच्याशी स्पर्धा करताना ते बालपण आठवतंय.. ते बालपण.. कधी त्या मालगावच्या ओढ्यावर मासे पकडण्यात तर कधी त्या किल्ल्यासाठी कोठेतरी सायकलवरून जाण्यात.. तो उरूस अन त्या उरुसातले पाळणे,ती खेळणी अन मामाच्या घरच मटण.. मटण म्हणलं आन आठवलं त्यो आमच्या सांगरुळचा अल्लावा..!! सारं कसं हरवलं होतं पण आज पुन्हा ते आठवलं..!! - सौरभ भगवंत कासोटे #covid19 #Coro

२० एप्रिल २०१५

२० एप्रिल २०१५ काल रात्री कधी झोप लागली कळालेच नाही.. सकाळी ५:४५ च्या दरम्यानच जाग आली अन रात्रीचे आठवले नेमकं कळेना स्वप्न होत की सत्य..!! म्हणुन fb पाहिलं आणि सत्य होतं..!! मग काय.. काय करावे कळेना.. सरळ अंघोळ केली आणि गेलो आई महालक्ष्मीला भेटायला..!! आई महालक्ष्मीवर माझा पूर्ण विश्वास होता आणि अजुनही आहे.. माझ्या प्रत्येक संकटमध्ये आई महालक्ष्मी होती म्हणुन मला या सर्वोत्तम सुखाच्या क्षणी आई महालक्ष्मी ला भेटायचे होते.. वातावरण कसं एकदम ताजे होते.. वारा कसा मुक्त पणे वाहत होता.. तोवर fb ची नॉटिफिकेशन वाजली..!!!! जान्हवीने friend requist accept केली..❤️ ती ऑनलाईन दिसली, ६:४५ झालेले.. काय करू काय नको असं होऊ लागलं.. हा, युवऱ्याला कॉल करतो, त्याला केला आणि सगळं सांगितलं.. तो म्हणाला हो पुढं हाय मी सोबत तुझ्या..!! मग मनाली ला मेसेज केला.. ती म्हणाली कर ना जान्हवीला मेसेज.. पण अस कसं.. तेही मुलीला मेसेज.. मी नाही कधी बोलत असं 😅 एकवेळ fb ला requist पाठवू शकतो पण मेसेज 😅 तोवर fb च्या मेसेज ची ring वाजली.. अन ते पाहुन डोळ्यातुन पाणी आले.. आई महालक्ष्मीची शपथ..!!

भांडण

इमेज
भांडण आत्ताच एक बातमी ऐकली, चीन मध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय कारण काय तर ३ महिने घरी एकत्र असल्यामुळे सारखी भांडणे होत होती अन त्यामुळे.. भांडण.. हा शब्द जरी कानावर पडला तर ते लहानपणीचे दिवस आठवतात.. आई बाबांचे भांडण..!! नेमकं काय होतं होते काय माहिती पण सारखी भांडणे होत होती, बाबा तर आई ला मारायचे, शिव्या द्यायचे अन आई फक्त रडायची.. मी तसाच पाहत असायचो.. खूप भिती वाटायची.. ना भाऊ ना बहिण की आजी आजोबाही राहत नव्हते जवळ.. फक्त ३ जणांचं कुटुंब..   मग अशी भांडणे दर आठवड्याला असायची कधी मला गणिताचे उत्तर येत नसले की बाबा मला मारताना आई मध्ये आली की भांडण तर कधी चुकून जेवणात केस आला तर ते ताट किचन मधुन त्या जमिनीवरून सरकत तर कधी कधी त्या विमानासारखे उडत हॉल मध्ये येई.. मी तसाच पाहत असायचो.. खूप भीती वाटायची.. मग मोठा झाल्यावर अस कायतरी झालं की महालक्ष्मीला जायचो.. सहनच होत नव्हतं कधी ते.. मला असा एकही क्षण नाही आठवत की मी माझ्या आई बाबांसोबत कधीतरी रंकाळ्यावर गेलोय की कधी फिल्म पाहायला..!! मग ते दिवाळी आणि उन्हाळयात मामाच्या गावी गेलो की कसं मस्त असायचं अन