भांडण

भांडण



आत्ताच एक बातमी ऐकली, चीन मध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय कारण काय तर ३ महिने घरी एकत्र असल्यामुळे सारखी भांडणे होत होती अन त्यामुळे..
भांडण..
हा शब्द जरी कानावर पडला तर ते लहानपणीचे दिवस आठवतात.. आई बाबांचे भांडण..!!
नेमकं काय होतं होते काय माहिती पण सारखी भांडणे होत होती, बाबा तर आई ला मारायचे, शिव्या द्यायचे अन आई फक्त रडायची..
मी तसाच पाहत असायचो.. खूप भिती वाटायची..
ना भाऊ ना बहिण की आजी आजोबाही राहत नव्हते जवळ.. फक्त ३ जणांचं कुटुंब..

 

मग अशी भांडणे दर आठवड्याला असायची कधी मला गणिताचे उत्तर येत नसले की बाबा मला मारताना आई मध्ये आली की भांडण तर कधी चुकून जेवणात केस आला तर ते ताट किचन मधुन त्या जमिनीवरून सरकत तर कधी कधी त्या विमानासारखे उडत हॉल मध्ये येई..
मी तसाच पाहत असायचो.. खूप भीती वाटायची..
मग मोठा झाल्यावर अस कायतरी झालं की महालक्ष्मीला जायचो..
सहनच होत नव्हतं कधी ते..
मला असा एकही क्षण नाही आठवत की मी माझ्या आई बाबांसोबत कधीतरी रंकाळ्यावर गेलोय की कधी फिल्म पाहायला..!!
मग ते दिवाळी आणि उन्हाळयात मामाच्या गावी गेलो की कसं मस्त असायचं अन ते पुन्हा कोल्हापुरला यायलाच नको वाटायचं...

 

दुसऱ्यांचे आई बाबा कधीच नाही भांडत, ते मुलांना घेऊन रंकाळ्यावर जातात, फिल्म पाहायला जातात हे पाहुन खुप बाद वाटायचं...
मी ही माझ्या मुलांना सगळं देईन, मी कधीच माझ्या बायको बरोबर नाही भांडणार, मी कधीच माझ्या बाबांसारखा नाही होणार असं त्या मनात सारखं यायचं..
ती भीती अजूनही मुरलीये मनात, तो भांडणाचा प्रत्येक शब्द लपंडाव खेळतोय.. तो शब्द शोधण्यासाठी अगदी जीवाची कधी कधी तळमळ होते, कारण एकदा ते मला बाहेर फेकून द्यायचं आहे..
एकदा मला मन मोकळं करून श्वास घ्यायचाय..
पण मन मोकळं करायला जातो आणि आई बाबांच्या भांडणाचा आवाज येतो..
पुन्हा ते छातीचे ठोके वाढतात, डोळ्यात पाणी येतं..
मग हे जगणं च नको वाटतं..!!!


 

Hey, कधीतरी अशी गोष्ट लिहिणारा तुमचा मुलगा किंवा मुलगी असु नये आणि म्हणूनच समजावुन घ्या एकमेकांना..
नवरा बायको च नाही तर इतर जनांनाही..

कशी वाटली स्टोरी??
By the way it's काल्पनिक..

Thanks for reading,
- Saurabh Pramila Kasote
११ एप्रिल २०२०

 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Self help books

Achyut godbole books