पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भांडण

इमेज
भांडण आत्ताच एक बातमी ऐकली, चीन मध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय कारण काय तर ३ महिने घरी एकत्र असल्यामुळे सारखी भांडणे होत होती अन त्यामुळे.. भांडण.. हा शब्द जरी कानावर पडला तर ते लहानपणीचे दिवस आठवतात.. आई बाबांचे भांडण..!! नेमकं काय होतं होते काय माहिती पण सारखी भांडणे होत होती, बाबा तर आई ला मारायचे, शिव्या द्यायचे अन आई फक्त रडायची.. मी तसाच पाहत असायचो.. खूप भिती वाटायची.. ना भाऊ ना बहिण की आजी आजोबाही राहत नव्हते जवळ.. फक्त ३ जणांचं कुटुंब..   मग अशी भांडणे दर आठवड्याला असायची कधी मला गणिताचे उत्तर येत नसले की बाबा मला मारताना आई मध्ये आली की भांडण तर कधी चुकून जेवणात केस आला तर ते ताट किचन मधुन त्या जमिनीवरून सरकत तर कधी कधी त्या विमानासारखे उडत हॉल मध्ये येई.. मी तसाच पाहत असायचो.. खूप भीती वाटायची.. मग मोठा झाल्यावर अस कायतरी झालं की महालक्ष्मीला जायचो.. सहनच होत नव्हतं कधी ते.. मला असा एकही क्षण नाही आठवत की मी माझ्या आई बाबांसोबत कधीतरी रंकाळ्यावर गेलोय की कधी फिल्म पाहायला..!! मग ते दिवाळी आणि उन्हाळयात मामाच्या गावी गेलो की कसं मस्त असायचं अन