पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

BOIS Locker Room

इमेज
BOIS Locker Room दोन दिवस झाले प्रकरण खूपच गाजत आहे..!!! खरंच चूक कोणाची नेमकं हा प्रश्न येतोय..!!! Social मीडिया ची का? त्या १५-१७ वयातल्या मुलांची? मुलांच्या पालकांची? की वयाची (teenage)? आज काल पाहतोय, मुलं रडायला लागली की हा घे मोबाईल..!!! मग ते लाडकं बाळ शांत होत.. आमच्या वेळी मोबाइल वैगेरे नव्हताच.. तेव्हा ते संध्याकाळी pubg खेळण्याऐवजी आम्ही मैदानात क्रिकेट खेळायचो.. रामरक्षा,शुभंकरोती,हनुमान चालीसा रोज असायचं.. पण आता त्या tiktok वरील आवाज ऐकू येतायेत... सगळी कडे म्हणले जाते sexual education दिले पाहिजे.. अहो नेमकं ते आहे तरी काय हे सांगा ना मग पालक देतील ते... म्हणून १० वीला धडा पण केला.. पण मार्क पडण्याच्या शर्यतीत नेमकं sexual education च नाही मिळालं.. आजकाल हे social media च इतकं प्रमाण वाढलंय.. अरे ते ७-८ वर्षाचं पोरगं इंस्टा ला असतंय.. त्याला ५ चा पाढा येत नाही आणि इंस्टाला मात्र ५०-७० follow वैगरे असतात.. मी इंस्टा, फेसबुक वापरत नव्हतो आता ते ही engineering world साठी fb ला आलोय.. पण ७-८ वी ची मुले हसतात, दादा, तू इंस्टाला नाहीस 😂 हा त्यांचा दोष अजिबात नाहीये,खरंच नाहीय

लॉकडाउन चा पहिला दिवस

लॉकडाऊन चा पहिला दिवस तशी नेहमी प्रमाणे चौकात ४-५ पोर थांबली होती.. पण पानपट्टी बंद असल्याने रस्ता रंगवायचे काम तस बंदच होते.. शाहू बँकेजवळ ५-६ जेष्ठ नागरिक बसले होते, इस्लामपुरात ४ घावलीत बघा, सातरयात एक.. तोवर एक पोलिसांची गाडी आली आणि एक साहेब उतरून त्यांनी त्या जेष्ठ नागरिकांना नमस्कार च केला, वरती मान करेपर्यंत सगळे आपआपल्या घरी.. मी मात्र अत्यावश्यक (माझ्यासाठी) वस्तू साठी फिरत होतो, संदीप बेकरी बंद.. शेवटी तिच्या अपार्टमेंट मध्ये एक दुकान सुरू होते तिथे मिळाले.. शाहू बँकेजवळ गेलो आणि पाहिले, तिची खिडकी ही open होती, light ही होती, बहुतेक वर्क फ्रॉम होम करत असावी..काळजी मिटली..😅 तसं उमेश काकांच्या दुकानात नेहमी पेक्षा जास्तच गर्दी होती.. नंगीवली चौकातील मटणाची दुकाने मात्र बंद होती नाहीतर ते जाता येता बाहेर लोंबकळत असलेले मटण पाहून तेवढंच बरं वाटतं.. पन आज काय तसं सकाळी वाचलेल्या राशी भविष्याप्रमाणे "मनाला समाधान" मिळणार नाही हेच खरं वाटलं..

लॉकडाऊन

लॉकडाऊन २०२० घामाच्या कश्या धारा येतायेत.. जसा ते लहानपणी क्रिकेट खेळताना,ते कॉलेजला गेल्यावर फुटबॉल खेळताना होत होतं अगदी तसं.. त्या मुंबईला लोकल मध्ये पाहिलेलं एखादं जोडपं कसं एकमेकाला चिटकून उभा राहत तसा शर्ट ही घामामुळे अगदी अंगाला चिटकून थांबलाय.. बाहेर फक्त फक्त शांतता पसरलीये, हा ती शांतता, कराड मध्ये शेवटच्या दिवशी रात्री १-२ ला नदीच्या पुलावर गेलो होतो अगदी तशीच... तो वाहणारा वारा कोठेतरी या काँक्रेट च्या जंगलात वाट चुकवून कोठे गेलाय काय माहिती की त्याने पण ठरवलंय जास्त बाहेर फिरायचं नाही..?? ती खाली लहान मुलेही खेळत नाहीयेत असं वाटतय मुलांच्या परीक्षेचा काळ सुरू आहे..!! हा पण ते कोकिळेचं कुहू-कुहू अगदी स्पष्ट ऐकू येतंय मग तिच्याशी स्पर्धा करताना ते बालपण आठवतंय.. ते बालपण.. कधी त्या मालगावच्या ओढ्यावर मासे पकडण्यात तर कधी त्या किल्ल्यासाठी कोठेतरी सायकलवरून जाण्यात.. तो उरूस अन त्या उरुसातले पाळणे,ती खेळणी अन मामाच्या घरच मटण.. मटण म्हणलं आन आठवलं त्यो आमच्या सांगरुळचा अल्लावा..!! सारं कसं हरवलं होतं पण आज पुन्हा ते आठवलं..!! - सौरभ भगवंत कासोटे #covid19 #Coro

२० एप्रिल २०१५

२० एप्रिल २०१५ काल रात्री कधी झोप लागली कळालेच नाही.. सकाळी ५:४५ च्या दरम्यानच जाग आली अन रात्रीचे आठवले नेमकं कळेना स्वप्न होत की सत्य..!! म्हणुन fb पाहिलं आणि सत्य होतं..!! मग काय.. काय करावे कळेना.. सरळ अंघोळ केली आणि गेलो आई महालक्ष्मीला भेटायला..!! आई महालक्ष्मीवर माझा पूर्ण विश्वास होता आणि अजुनही आहे.. माझ्या प्रत्येक संकटमध्ये आई महालक्ष्मी होती म्हणुन मला या सर्वोत्तम सुखाच्या क्षणी आई महालक्ष्मी ला भेटायचे होते.. वातावरण कसं एकदम ताजे होते.. वारा कसा मुक्त पणे वाहत होता.. तोवर fb ची नॉटिफिकेशन वाजली..!!!! जान्हवीने friend requist accept केली..❤️ ती ऑनलाईन दिसली, ६:४५ झालेले.. काय करू काय नको असं होऊ लागलं.. हा, युवऱ्याला कॉल करतो, त्याला केला आणि सगळं सांगितलं.. तो म्हणाला हो पुढं हाय मी सोबत तुझ्या..!! मग मनाली ला मेसेज केला.. ती म्हणाली कर ना जान्हवीला मेसेज.. पण अस कसं.. तेही मुलीला मेसेज.. मी नाही कधी बोलत असं 😅 एकवेळ fb ला requist पाठवू शकतो पण मेसेज 😅 तोवर fb च्या मेसेज ची ring वाजली.. अन ते पाहुन डोळ्यातुन पाणी आले.. आई महालक्ष्मीची शपथ..!!