लॉकडाऊन

लॉकडाऊन २०२०

घामाच्या कश्या धारा येतायेत..
जसा ते लहानपणी क्रिकेट खेळताना,ते कॉलेजला गेल्यावर फुटबॉल खेळताना होत होतं अगदी तसं..
त्या मुंबईला लोकल मध्ये पाहिलेलं एखादं जोडपं कसं एकमेकाला चिटकून उभा राहत तसा शर्ट ही घामामुळे अगदी अंगाला चिटकून थांबलाय..
बाहेर फक्त फक्त शांतता पसरलीये, हा ती शांतता, कराड मध्ये शेवटच्या दिवशी रात्री १-२ ला नदीच्या पुलावर गेलो होतो अगदी तशीच...
तो वाहणारा वारा कोठेतरी या काँक्रेट च्या जंगलात वाट चुकवून कोठे गेलाय काय माहिती की त्याने पण ठरवलंय जास्त बाहेर फिरायचं नाही..??
ती खाली लहान मुलेही खेळत नाहीयेत असं वाटतय मुलांच्या परीक्षेचा काळ सुरू आहे..!!
हा पण ते कोकिळेचं कुहू-कुहू अगदी स्पष्ट ऐकू येतंय मग तिच्याशी स्पर्धा करताना ते बालपण आठवतंय..
ते बालपण..
कधी त्या मालगावच्या ओढ्यावर मासे पकडण्यात तर कधी त्या किल्ल्यासाठी कोठेतरी सायकलवरून जाण्यात..
तो उरूस अन त्या उरुसातले पाळणे,ती खेळणी अन मामाच्या घरच मटण.. मटण म्हणलं आन आठवलं त्यो आमच्या सांगरुळचा अल्लावा..!!
सारं कसं हरवलं होतं पण आज पुन्हा ते आठवलं..!!

- सौरभ भगवंत कासोटे
#covid19 #Corona #Kolhapur

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Self help books

भांडण

Achyut godbole books