BOIS Locker Room

BOIS Locker Room



दोन दिवस झाले प्रकरण खूपच गाजत आहे..!!!
खरंच चूक कोणाची नेमकं हा प्रश्न येतोय..!!!
Social मीडिया ची का?
त्या १५-१७ वयातल्या मुलांची?
मुलांच्या पालकांची?
की वयाची (teenage)?
आज काल पाहतोय, मुलं रडायला लागली की हा घे मोबाईल..!!!
मग ते लाडकं बाळ शांत होत..
आमच्या वेळी मोबाइल वैगेरे नव्हताच..
तेव्हा ते संध्याकाळी pubg खेळण्याऐवजी आम्ही मैदानात क्रिकेट खेळायचो..
रामरक्षा,शुभंकरोती,हनुमान चालीसा रोज असायचं..
पण आता त्या tiktok वरील आवाज ऐकू येतायेत...
सगळी कडे म्हणले जाते sexual education दिले पाहिजे..
अहो नेमकं ते आहे तरी काय हे सांगा ना मग पालक देतील ते...
म्हणून १० वीला धडा पण केला..
पण मार्क पडण्याच्या शर्यतीत नेमकं sexual education च नाही मिळालं..
आजकाल हे social media च इतकं प्रमाण वाढलंय..
अरे ते ७-८ वर्षाचं पोरगं इंस्टा ला असतंय..
त्याला ५ चा पाढा येत नाही आणि इंस्टाला मात्र ५०-७० follow वैगरे असतात..
मी इंस्टा, फेसबुक वापरत नव्हतो आता ते ही engineering world साठी fb ला आलोय..
पण ७-८ वी ची मुले हसतात, दादा, तू इंस्टाला नाहीस 😂
हा त्यांचा दोष अजिबात नाहीये,खरंच नाहीये..
त्या मुलाला आई बाबांचा वेळ हवा असतो,
पण आज कालचे so called modern आई-बाबा दिवसरात्र ते इंस्टाला, फेसबुकला, व्हाट्सअप्प ला आणि एकमेकांचे पटत नसेल तर tinder ला..!!!!
मग पोरगं रडायला लागलं की द्यायचा त्याला मोबाईल आणि आपण एक मोठा पराक्रम केल्यासारखं छाती एकदम पुढे करून पुन्हा त्या social media मध्ये घुसायचं..!!!
अहो जरा लाज बाळगा, ते काढलंय ना त्याला वेळ द्या..
इंस्टा, फेसबुक वापरून तुम्ही ट्रम्प तात्या होणार नाही आहात..
त्यांच्या सोबत खेळा थोडं आनंद काय असतो हे समजेल..
आणि social media चा खूपच तुमचं पिल्लू वापर करत असेल ना तर द्या दोन ठेवून..!!!
नाहीतर माझं पिल्लू इंस्टा , फेसबुक ला किती छान फोटो टाकतं,
Tiktok ला कसले छान छान व्हिडिओ करत असं म्हणलं तर..
मग येतात अशी प्रकरणे नंतर बाहेर..
आणि येत राहतीलच..
जरा व्हा जागे..
Social media पासून दूर राहून त्या मुलांना द्या वेळ..
पोरांना रामरक्षा, हनुमान चालीसा वैगेरे शिकवा..
त्यांना ते छत्रपती शिवरायांच्या गोष्टी सांगा..
आणि youtube वर नाही, स्वतः वयक्तिक

- सौरभ कासोटे, कोल्हापूर

आई बाबांचं भांडण : https://saurabhkasote.blogspot.com/2020/04/Bhandan.html

#BoisLockerRoom #BoysLockerRoom #Teenage #Instagram #Facebook #SocialMedia

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Self help books

भांडण

Achyut godbole books