पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

17 March 2018

 दोन वर्षापूर्वी.. हा दिवस.. नेमकं याला the best day म्हणावं की the worst day हेच नाही कळत.. तू घरी आली होतीस आणि आपण इतक्या जवळ आलो होतो की ते क्षण अजूनही असे डोळ्यासमोर आहेत अन त्याच दिवशी रात्री तू सोडून गेलीस मला कायमच.. बहुतेक तुला माहिती नसावं, नवीन माणसांमुळे विसरली असणार तु... आज २ वर्षे झालीत तरीही मी move on च होऊ शकलो नाहीये ग.. असा दिवसच आला नाही की त्या दिवशी तुझी आठवण आली नाही की अशी रात्र आली नाही की त्या रात्रीच्या स्वप्नांमध्ये तू आली नाहीस.. प्रत्येकजण म्हणतो,"सौऱ्या काय असतंय, ती तिकडं एन्जॉय करत्या अन तू अस देवदास होतंयस" पण प्रत्येकाला कस सांगू की किती स्वप्न पहिली होती, किती त्या एखाद्या शुभ्र पांढऱ्या कागदावर कुंचल्याचा एक हात फिरवावा तशी स्वप्नं रंगवली होती.. २ वर्षे मी माझा B'day काय दिवाळी पन साजरी नाही केली.. तुझा कळत खूप काय काय.. तुझा गोव्यातील bday,pub च्या पार्ट्या, ड्रिंक वैगेरे आणि बरच काही.. फक्त त्यांना ok एवढचं बोलतो अन त्या स्मशानातल्या शांततेत हरवून गेलेलो असतो तोवर तो हळूच हुंदक्याचा आवाज वर्तमानात आणतो.. अजूनही होते असं.. खूप जण म्ह

Past

 आज सकाळ पासूनच लक्ष कोठेही लागत नाहीये.. पाऊस तर बाहेर सुरूच आहे.. थोडी थंडीही आहे..  हातावरचे लव असे एकमेकांना आधार न देता उभे राहिलेत..  हळूच थंड हवेची झुळूक येते अन एक वेगळाच अनुभव देऊन जाते.. समोर खिडकीतून प्रकाश येतोय पण डोळ्यांसमोर तर भूतकाळाच्या आठवणी नाचतायेत.. मागे बाबांच्या कॉम्पुटर चा तो आवाज तर मोबाइल मधील gaana मधील त्या "प्रेमम"चं "मलारे" गाणं वाजत आहेच..  अर्थ वैगरे काहीच कळत नाहीये पण ते भूतकाळाच्या सुखद आठवणींचा अनुभव होतोय.. असं वाटतंय ती हसतीये.. अस वाटतंय ती अजूनही सभोवताली आहे.. हा ती वाऱ्याची झुळूक येते तेव्हा अगदी ते शरीराला जसा वाटतं ना ते तिच्या त्या मिठीत असताना वाटत होत.. हो अगदी तसच.. तो दीर्घ श्वास घेण्यासाठी हुंदका हळूच बाहेर येत आहे.. अजूनही तो आसू बाहेर येत नाहीये.. फक्त दीर्घ श्वास आणि त्या आठवणी इतकंच.. आणि इतक्यात डोक्यामधल्या त्या मेंदू मध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू झाली आहे मला पुन्हा वर्तमानात आणण्याची.. जागा हो सौर्या जागा हो..!!! - सौरभ कासोटे Online education :  https://saurabhkasote.blogspot.com/2020/08/Onlineeducation.html

online शिक्षण

 online शिक्षण या covid-19 मुळे "onlineशिक्षण" हा ट्रेंड आणि त्या नावाखाली "मोबाईल, टॅब इत्यादी" उपकरणे वापरणे हे आता जणू गरज आहे असं वाटत आहे. एक वेळ अन्न, वस्त्र,निवारा नसेल तरी it's ok पण.. असाच एक किस्सा.. माझी एकदम जवळची नातेवाईक.. इयत्ता १२ वी, कॉमर्स..!! तर ते व्हाट्सअप्प ला वैगेरे व्हिडिओ येतात मग असलेल्या मोबाइल ची मेमरी कमी पडू लागली म्हणून मला फोन आला,"कोणता मोबाईल घेऊ?" मी म्हणालो मेमरी कमी पडतीये तर मेमरी कार्ड घे , ७००-८०० रुपये पर्यंत पडेल, स्वस्त मस्त.. पण तिचा सूर मोबाइल घेण्याचा होता.. मोबाइल पाहू लागलो तर किंमती १० हजार पासून पुढे.. असुदे, कोणता तरी सुचवला.. आणि एक आठवड्याने कॉल आला,"मोबाईल घेतला", १०६०० कायतरी, रिअल मी असं कायतरी, एकदम आठवलं अरे हा तर ब्रँड फोटो साठी वैगरे घेतात,जर शिक्षणासाठीच हवा होता तर ९००० पर्यंत आहे की ४ gb रॅम वगैरे असणारे.. असो मग मी तिला एक प्रश्न विचारला,"गणिताच्या पहिल्या प्रकरणाचे नाव काय ग, दुसऱ्या प्रकरणाचे नाव?" "अरे गणित नसतं आम्हाला, म्हणजे ते अकाउंट मध्ये असतं&