17 March 2018

 दोन वर्षापूर्वी.. हा दिवस.. नेमकं याला the best day म्हणावं की the worst day हेच नाही कळत..

तू घरी आली होतीस आणि आपण इतक्या जवळ आलो होतो की ते क्षण अजूनही असे डोळ्यासमोर आहेत अन त्याच दिवशी रात्री तू सोडून गेलीस मला कायमच..

बहुतेक तुला माहिती नसावं, नवीन माणसांमुळे विसरली असणार तु...

आज २ वर्षे झालीत तरीही मी move on च होऊ शकलो नाहीये ग.. असा दिवसच आला नाही की त्या दिवशी तुझी आठवण आली नाही की अशी रात्र आली नाही की त्या रात्रीच्या स्वप्नांमध्ये तू आली नाहीस..

प्रत्येकजण म्हणतो,"सौऱ्या काय असतंय, ती तिकडं एन्जॉय करत्या अन तू अस देवदास होतंयस" पण प्रत्येकाला कस सांगू की किती स्वप्न पहिली होती, किती त्या एखाद्या शुभ्र पांढऱ्या कागदावर कुंचल्याचा एक हात फिरवावा तशी स्वप्नं रंगवली होती..

२ वर्षे मी माझा B'day काय दिवाळी पन साजरी नाही केली..

तुझा कळत खूप काय काय.. तुझा गोव्यातील bday,pub च्या पार्ट्या, ड्रिंक वैगेरे आणि बरच काही.. फक्त त्यांना ok एवढचं बोलतो अन त्या स्मशानातल्या शांततेत हरवून गेलेलो असतो तोवर तो हळूच हुंदक्याचा आवाज वर्तमानात आणतो..

अजूनही होते असं..

खूप जण म्हणतील "it's her choice 😂" 

पण मी ज्या मुलीवर प्रेम केलं, ज्या मुलींसोबत ती स्वप्नं रंगवली तिची choice काय तिचे विचार पण कधी असे नव्हते ग.. अन म्हणूनच तो गालावरून एक अश्रु चा थेंब एखादया लहान मुलाप्रमाणे घसरगुंडी करत खाली येतो...

खूप काही बोलावेसे वाटते पण नको, खूप वेळ तुला दिला तर मला माझं आयुष्य जगता येणार नाही..

Btw बाबा दिसतात ३-४ days मधुन, ते संक्याबरोबर चहा घ्यायला तुमच्या इथेच येतो ना..

त्यामुळे बाबा दिसतात आणि त्या स्वयंपाक घरातील light ही... पन तुझी रूम मात्र माझ्या आयुष्याप्रमाने अंधारातच असते..

वाट पाहतोय कधी तो लख्ख प्रकाश येतोय याची..

चल bye, take care

With love,

From Saurabh 🙂


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Self help books

भांडण

Achyut godbole books