online शिक्षण

 online शिक्षण

या covid-19 मुळे "onlineशिक्षण" हा ट्रेंड आणि त्या नावाखाली "मोबाईल, टॅब इत्यादी" उपकरणे वापरणे हे आता जणू गरज आहे असं वाटत आहे.

एक वेळ अन्न, वस्त्र,निवारा नसेल तरी it's ok पण..
असाच एक किस्सा..
माझी एकदम जवळची नातेवाईक..
इयत्ता १२ वी, कॉमर्स..!!
तर ते व्हाट्सअप्प ला वैगेरे व्हिडिओ येतात मग असलेल्या मोबाइल ची मेमरी कमी पडू लागली म्हणून मला फोन आला,"कोणता मोबाईल घेऊ?"
मी म्हणालो मेमरी कमी पडतीये तर मेमरी कार्ड घे , ७००-८०० रुपये पर्यंत पडेल, स्वस्त मस्त..
पण तिचा सूर मोबाइल घेण्याचा होता..
मोबाइल पाहू लागलो तर किंमती १० हजार पासून पुढे..
असुदे, कोणता तरी सुचवला..
आणि एक आठवड्याने कॉल आला,"मोबाईल घेतला", १०६०० कायतरी, रिअल मी असं कायतरी, एकदम आठवलं अरे हा तर ब्रँड फोटो साठी वैगरे घेतात,जर शिक्षणासाठीच हवा होता तर ९००० पर्यंत आहे की ४ gb रॅम वगैरे असणारे..
असो मग मी तिला एक प्रश्न विचारला,"गणिताच्या पहिल्या प्रकरणाचे नाव काय ग, दुसऱ्या प्रकरणाचे नाव?"
"अरे गणित नसतं आम्हाला, म्हणजे ते अकाउंट मध्ये असतं"
मी एकदम बुचकळ्यात पडलो," म्हणजे माझ्याकडे एक १२ वी कॉमर्स चा मुलगा गणित शिकायला येत होता ते काय होतं"
शेवटी मी म्हणलो,"असुदे, करा ऑनलाईन अभ्यास"
आणि धन्य झालो..!!
धन्य ते ऑनलाईन शिक्षण आणि धन्य ते त्या मुलांचे पालक..
काल "abp माझा" ला "सुधा मूर्ती" यांच्यासोबत गप्पांचा कार्यक्रम होता,
त्यातील शेवटच बोलणं खरंच आताच्या पालकांना खूप उपयोगी आहे असं मला वाटतं,
"मूल बोट दाखवेल ती वस्तू घेऊन देऊ नये"
अर्थात, फाझील लाड करू नये..!!

- सौरभ कासोटे

अजूनही काही : https://saurabhkasote.blogspot.com/2020/08/past.html

#onlineeducation #Online #Covid19

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Self help books

भांडण

Achyut godbole books