Past

 आज सकाळ पासूनच लक्ष कोठेही लागत नाहीये..

पाऊस तर बाहेर सुरूच आहे.. थोडी थंडीही आहे.. 

हातावरचे लव असे एकमेकांना आधार न देता उभे राहिलेत.. 

हळूच थंड हवेची झुळूक येते अन एक वेगळाच अनुभव देऊन जाते..

समोर खिडकीतून प्रकाश येतोय पण डोळ्यांसमोर तर भूतकाळाच्या आठवणी नाचतायेत..

मागे बाबांच्या कॉम्पुटर चा तो आवाज तर मोबाइल मधील gaana मधील त्या "प्रेमम"चं "मलारे" गाणं वाजत आहेच.. 

अर्थ वैगरे काहीच कळत नाहीये पण ते भूतकाळाच्या सुखद आठवणींचा अनुभव होतोय..

असं वाटतंय ती हसतीये..

अस वाटतंय ती अजूनही सभोवताली आहे..

हा ती वाऱ्याची झुळूक येते तेव्हा अगदी ते शरीराला जसा वाटतं ना ते तिच्या त्या मिठीत असताना वाटत होत..

हो अगदी तसच..

तो दीर्घ श्वास घेण्यासाठी हुंदका हळूच बाहेर येत आहे..

अजूनही तो आसू बाहेर येत नाहीये..

फक्त दीर्घ श्वास आणि त्या आठवणी इतकंच..

आणि इतक्यात

डोक्यामधल्या त्या मेंदू मध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू झाली आहे मला पुन्हा वर्तमानात आणण्याची..

जागा हो सौर्या जागा हो..!!!


- सौरभ कासोटे


Online education : https://saurabhkasote.blogspot.com/2020/08/Onlineeducation.html

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Self help books

भांडण

Achyut godbole books