पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिवाळी

दिवाळी दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास.. दिवाळी म्हणजे झगमगत्या कंदिलाचा प्रकाश.. दिवाळी म्हणजे श्री रामांचे आगमन, दिवाळी म्हणजे श्रीकृष्णाचा नरकासुरवर विजय.. दिवाळी म्हणजे नरकसुराच्या तुरंगातून स्त्रियांची मुक्तता.. दिवाळी म्हणजे तो छत्रपतींचा किल्ला.. दिवाळी म्हणजे लाडवाचा गोडवा, दिवाळी म्हणजे चकली चा खुशकुशीत पणा.. दिवाळी म्हणजे नयनरम्य आतिषबाजी.. दिवाळी म्हणजे अंगणातील मोहक रांगोळी... दिवाळी म्हणजे भगवान महावीर यांची मोक्षप्राप्ती.. दिवाळी म्हणजे शीख गुरू हरगोबिन्द सिंह यांची सुटका.. दिवाळी म्हणजे मामाच्या गावी जाण्याची घाई... दिवाळी म्हणजे मन प्रसन्न करणाऱ्या संगीताची पहाट.. दिवाळी म्हणजे तो उटण्याचा सुगंध.. दिवाळी म्हणजे कुटुंबाचा एकोपा.. दिवाळी म्हणजे आई महालक्ष्मी चे दर्शन.. दिवाळी म्हणजे आनंद, सुख, समृद्धी,सत्याचा विजय.. - सौरभ कासोटे तुम्हा सर्वांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा..🙂

वचन

वचन अष्टमीचा अर्धकोर चंद्र तसा अगदी दिमाखात "रजनीकांत" या नावाला शोभेल असा निरभ्र आकाशात स्थानापन्न होता.. रात्रीचे ८:३०-९ वाजायला आले होते.. देवघरातील दिवा लावून तास-दीड तास झाला होता.. त्याचा कॉल आलेलाच की वेळ होईल म्हणून पण इतका वेळ यामुळे ती काळजीने थोडी अस्वस्थ झाली होती.. गळ्यातील ते अगदी दुरुनही उठून दिसेल असे सोन्याच्या मंगळसूत्राबरोबर ची तिच्या हातांची झटपट सांगत होती की ती आता खूपच अस्वस्थ झालीये...!! सारखे ते तिचे सुबकरदार पण थोडे पाणावलेले डोळे दाराकडे पाहत होते.. कानामध्ये जरी वजनदार अश्या design चे दागिने असले तरी कानांचे लक्ष बाहेर त्याची गाडी येते की नाही याकडेच होते.. स्वयंपाक करण्यासाठी ही मन होत नव्हते.. चपाती करण्यासाठी कणिक मळली होती पण तिला अजून चांगला आकार घेऊन तव्यावर अंग शेकण्याचा योग येत नव्हता.. कूकर च्या ३-४ शिट्या झाल्या असतील पण आज त्याला नजर चूकीमुळे जास्त काम लागणार याची शक्यता दिसत होती..!!! नेमका फोन करावा तर तो गाडीवर असेल आणि रोडवरून येताना ट्रॅफिक खूप असते त्यामुळे तो नाही उचलणार याची खात्री तिला होती..त्यामुळे तिने तो विचार सोडून दिला.. थ

प्रेम

यांसी प्रेम ऐसें नाव..!! १६-१७ वय अन नवीन कॉलेज, नवीन मित्र, मोबाईल वैगेरे.. अन तोवर हळूच पाय न कळत घसरतो.. अगदी चित्रपटातील हिरो हिरोईन सारखा वाटू लागतं.. सतत कोणतातरी गाणं गुणगुणाव अस वाटतं.. अस वाटतं ही तर माझ्या साठी बनलेली आहे.. मग नशिबावर विश्वास बसायला लागतो, अस वाटतं देवानेच आमची गाठ भेट लिहून ठेवली आहे..!! काही दिवस बोलणं, मग ते रात्री ३-४ पर्यंत जागनं.. तिच्या/त्याचा आवाजाने दिवसाची सुरुवात.. दिवस पुढे पुढे सरतात.. नव्याचे नऊ दिवसा प्रमाणे सुरुवातीला "तुमच्यासाठी कायपण" असतं, पण नंतर थोडी भांडणं थोडा अबोला आणि जास्तच झाले तर ब्रेकअप..!! विषय संपला.. मग काही दिवसांनी लैला ला दुसरा मजनू आणि मजनू ला दुसरी लैला भेटते..!! ब्रेकअप झाला की यांचं "प्रेम" ही संपत..!! म्हणूनच मी ३ ऱ्या ओळीत म्हणालो ,"पाय घसरतो" कारण ते फक्त आकर्षण असतं, आभासी जग असतं..!! काही नाती टिकतात, अगदी लग्न करून शेवटपर्यंत.. त्याचं "प्रेम" असतं, आकर्षण नाही.. पण काही नाती "प्रेमाच्या" नावाखाली फक्त आकर्षण असतात.. प्रेम ही खूप वेगळी गोष्ट आहे.. खूप वेगळी..