दिवाळी

दिवाळी

दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास..
दिवाळी म्हणजे झगमगत्या कंदिलाचा प्रकाश..
दिवाळी म्हणजे श्री रामांचे आगमन,
दिवाळी म्हणजे श्रीकृष्णाचा नरकासुरवर विजय..
दिवाळी म्हणजे नरकसुराच्या तुरंगातून स्त्रियांची मुक्तता..
दिवाळी म्हणजे तो छत्रपतींचा किल्ला..
दिवाळी म्हणजे लाडवाचा गोडवा,
दिवाळी म्हणजे चकली चा खुशकुशीत पणा..
दिवाळी म्हणजे नयनरम्य आतिषबाजी..
दिवाळी म्हणजे अंगणातील मोहक रांगोळी...
दिवाळी म्हणजे भगवान महावीर यांची मोक्षप्राप्ती..
दिवाळी म्हणजे शीख गुरू हरगोबिन्द सिंह यांची सुटका..
दिवाळी म्हणजे मामाच्या गावी जाण्याची घाई...
दिवाळी म्हणजे मन प्रसन्न करणाऱ्या संगीताची पहाट..
दिवाळी म्हणजे तो उटण्याचा सुगंध..
दिवाळी म्हणजे कुटुंबाचा एकोपा..
दिवाळी म्हणजे आई महालक्ष्मी चे दर्शन..
दिवाळी म्हणजे आनंद, सुख, समृद्धी,सत्याचा विजय..
- सौरभ कासोटे
तुम्हा सर्वांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा..🙂

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Self help books

भांडण

Achyut godbole books