प्रेम

यांसी प्रेम ऐसें नाव..!!

१६-१७ वय अन नवीन कॉलेज, नवीन मित्र, मोबाईल वैगेरे..
अन तोवर हळूच पाय न कळत घसरतो..
अगदी चित्रपटातील हिरो हिरोईन सारखा वाटू लागतं..
सतत कोणतातरी गाणं गुणगुणाव अस वाटतं..
अस वाटतं ही तर माझ्या साठी बनलेली आहे..
मग नशिबावर विश्वास बसायला लागतो, अस वाटतं देवानेच आमची गाठ भेट लिहून ठेवली आहे..!!
काही दिवस बोलणं, मग ते रात्री ३-४ पर्यंत जागनं..
तिच्या/त्याचा आवाजाने दिवसाची सुरुवात..
दिवस पुढे पुढे सरतात..
नव्याचे नऊ दिवसा प्रमाणे सुरुवातीला "तुमच्यासाठी कायपण" असतं, पण नंतर थोडी भांडणं थोडा अबोला आणि जास्तच झाले तर ब्रेकअप..!!
विषय संपला..


मग काही दिवसांनी लैला ला दुसरा मजनू आणि मजनू ला दुसरी लैला भेटते..!!
ब्रेकअप झाला की यांचं "प्रेम" ही संपत..!!
म्हणूनच मी ३ ऱ्या ओळीत म्हणालो ,"पाय घसरतो"
कारण ते फक्त आकर्षण असतं, आभासी जग असतं..!!
काही नाती टिकतात, अगदी लग्न करून शेवटपर्यंत..
त्याचं "प्रेम" असतं, आकर्षण नाही..
पण काही नाती "प्रेमाच्या" नावाखाली फक्त आकर्षण असतात..
प्रेम ही खूप वेगळी गोष्ट आहे..
खूप वेगळी..


१६-१७ हे खरंच प्रेम समजावून घेण्याच वय नाहीये..
आणि समजणार ही नाही..
ते वय फुलपाखरांसारखं इकडून तिकडून फक्त मुक्तविहार करीत असत...
- सौरभ कासोटे, कोल्हापूर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Self help books

भांडण

Achyut godbole books