लॉकडाउन चा पहिला दिवस

लॉकडाऊन चा पहिला दिवस

तशी नेहमी प्रमाणे चौकात ४-५ पोर थांबली होती.. पण पानपट्टी बंद असल्याने रस्ता रंगवायचे काम तस बंदच होते..
शाहू बँकेजवळ ५-६ जेष्ठ नागरिक बसले होते, इस्लामपुरात ४ घावलीत बघा, सातरयात एक.. तोवर एक पोलिसांची गाडी आली आणि एक साहेब उतरून त्यांनी त्या जेष्ठ नागरिकांना नमस्कार च केला, वरती मान करेपर्यंत सगळे आपआपल्या घरी..
मी मात्र अत्यावश्यक (माझ्यासाठी) वस्तू साठी फिरत होतो, संदीप बेकरी बंद..
शेवटी तिच्या अपार्टमेंट मध्ये एक दुकान सुरू होते तिथे मिळाले..
शाहू बँकेजवळ गेलो आणि पाहिले, तिची खिडकी ही open होती, light ही होती, बहुतेक वर्क फ्रॉम होम करत असावी..काळजी मिटली..😅
तसं उमेश काकांच्या दुकानात नेहमी पेक्षा जास्तच गर्दी होती..
नंगीवली चौकातील मटणाची दुकाने मात्र बंद होती नाहीतर ते जाता येता बाहेर लोंबकळत असलेले मटण पाहून तेवढंच बरं वाटतं..
पन आज काय तसं सकाळी वाचलेल्या राशी भविष्याप्रमाणे "मनाला समाधान" मिळणार नाही हेच खरं वाटलं..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Self help books

भांडण

Achyut godbole books