कोल्हापूर

ताराराणी यांनी स्थापिले एक राज्य ,
तेच आमुचं कोल्हापूर 
कलेचं आणि कलाकारांचं माहेरघर..

महालक्ष्मीच्या पदस्पर्शाने झाले हे पवित्र 
शाहूमहाराजांच्या कार्याने झाले हे पावन..

पंचगंगेच्या काठी वसलेले हे गाव 
कलापूर हे त्याचे एक नाव..!!

अनेक कलांचा उगम झाला कोल्हापुरात 
म्हणून नाव आहे कलापुर सर्वांच्या मुखात..

रंकाळ्याच्या काठावर बसला आहे एक पॅलेस.. 
प्रेक्षकांच्या भावतो तो मनास..

भवानी मंडप हा कोल्हापूरकरांचा मान 
अन कोल्हापूर हीच आमची शान 
कोल्हापूर हीच आमची शान..!!

- सौरभ भगवंत कासोटे, कोल्हापूर
(कोल्हापूर विषयी दुसरी कविता : पुरेपूर कोल्हापूर )

माझे इतर लेख : सौरभ

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Self help books

भांडण

Achyut godbole books