पुरेपूर कोल्हापूर
फुटबॉलचे माहेरघर आणि चित्रपट सृष्टीचे माहेर,
असं आमचं कोल्हापूर..!!
असं आमचं कोल्हापूर..!!
घडते अनेक कलाकार आमच्या कोल्हापुरात
त्यांचा नावलौकिक अख्या जगात;
घडती अनेक मल्ल आमच्या कोल्हापूरच्या मातीत,
मिळवती विजय कुस्ती या खेळात..!!
दागिन्यांचा प्रकार एक "कोल्हापुरी साज"
जगात प्रसिद्ध आहे तो आज
जगात प्रसिद्ध आहे तो आज..
पोषाख असा आमच्या कोल्हापूरचा
पायात कोल्हापुरी चपला,
डोक्यावरती मानाचा कोल्हापुरी फेेटा..!!
कोल्हापुरी गूळ आणि कोल्हापुरी मिसळ
जगात लय भारी
कोल्हापुरी कोल्हापुरी मिसळ
जगात लय भारी..
तांबडा पांढरा रस्सा येऊन घ्या आमच्या कोल्हापुरी
तांबडा पांढरा रस्सा येऊन घ्या आमच्या कोल्हापुरी..!!
सौरभ भगवंत कासोटे, कोल्हापूर
माझे इतर लेख : सौरभ
(कोल्हापूर बद्दल दुसरी कविता :कोल्हापूर )