ती आता नाही येणार परत

  "ती आता नाही येणार परत, मान्य कर आणि शोध दुसरी"


अरे, नाही येणार म्हणजे?

खूप वेळा भांडणे झाली आहेत, पण ते चिमणीच पिल्लू जस उंच आकाशात झेप घेऊन पुन्हा घरट्यात येत तस तीही येतच होती..!!

अरे, तो दिवाळीचा दिवस होता, दरवेळी मित्रांबरोबर फटाके उडवणारा मी त्यादिवशी तिला घेऊन महालक्ष्मी ला गेलो होतो..

थंडी होतीच पण तिच्या अंगाचा उटण्याचा सुवास दरवळत होता जस अगदी त्या रातराणी सारखा..!!

दरवेळी ते वेगवेगळ्या style चे कपडे घालणारी ती पंजाबी ड्रेस मध्ये अगदी निरभ्र आकाशमध्ये चांदण पडत तशी सुंदर दिसत होती..

चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो मान्य आहे पण हीच रूप म्हणजे अगदी चंद्राचं मंद आणि हवंहवंसं वाटणार होतं...

आई महालक्ष्मी तर अगदी दिवाळी मुले खूपच सजली होती, सगळी कडे फुलांची आरास होती, दिवे लागले होते, आई महालक्ष्मी ने तर मी अन ती येणार आहेत म्हणुन सगळीकडे प्रसन्नता पसरवली होती असच वाटत होते..!!

आम्ही जेव्हा गेलो दर्शनाला तर आई महालक्ष्मी चे हास्य अन ते डोळे अस सांगत होते की तिला ही खूपच आनंद झाला आहे आम्ही आल्याचा..!!

अन तेव्हा हिने आई कडे आमच्या प्रेमासाठी मागणे ही मागितले..

अरे लहान मुले जशी एकमेकांच्या कानात "सिक्रेट" सांगतात तशी ही त्या बाप्पाच्या उंदीर मामा च्या कानामध्ये ही काहीतरी सांगायची..

हो, हे मान्य आहे की मी कधी नाही मागितले, कारण ती माझ्या सोबत होती मग आणि काय हवे होते..

पण तू म्हणतोस ती पुन्हा येणार नाही,तिला देव नाही का पावला, उंदीर मामाने नाही का सांगितलं बाप्पाला..??

हो पुन्हा महालक्ष्मी ला नाही गेलो मी ती गेल्यानंतर, मला राग नाहीये आईचां, कधी बाळ आईवर रागवत का?

पण एकटा कसा जाऊ?

माहितीये आई महालक्ष्मी अजूनही वाट पाहत आहे मी अन ती येणार याची पण तू तर म्हणत आहेस ती नाही येणार..!

अजून किती प्रेम करू मी?

दुसरी शोध म्हणजे??

अरे ते मुठी एवढ हृदय त्यात नेमकं कोणाकोणाला ठेवू?

हा, कधी कधी रागामुळे डोक्यात जाते ती पण पुन्हा काही वेळाने gravity मुळे म्हण किंवा हृदया च्या कार्यामुळे ती पुन्हा तिथे येते..!!

नाही शक्य नाही मला पुन्हा ते प्रेम, पुन्हा ते स्वप्न, पुन्हा ती भांडणं..!!

अरे रावणाला दसऱ्याला तुम्ही दरवेळी मारत असाल, पण सत्य हेच आहे की तो पुन्हा जन्म घेतच आहे, कधी महाराष्ट्र मध्ये तर कधी उत्तरप्रदेश मध्ये तर कधी दिल्लीच्या चालत्या बस मध्ये..!!

मग त्या रावणाच्या क्रूरते पुढे माझं तिच्यावर असेललं प्रेम काहीच नाही का, मी तर ऐकत होतो प्रेमासारखी शक्ती नाही मग जर रावण मरतच नसेल तर माझं तिच्या वरील प्रेम कसे मरेल रे..!!

नाही , श्री रामांनी एकदा धनुष्याला लावलेला बाण पुन्हा मागे घेता येत नाही त्याप्रमाणे एकदा तीच्यावर केलेलं मी प्रेम पुन्हा कसे मागे घेऊ??

- सौरभ कासोटे


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Self help books

भांडण

Achyut godbole books